मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना kyc अपडेट : सरकारची महत्त्वाची मोठी  घोषणा !!

लाडकी बहीण योजना 2026 :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2026

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जाते . राज्यातील  महिला आर्थिक व सामाजिक ,सक्षमीकरणासाठी ही योजना राबविण्यात येत आहे ही योजना  28जून 2024 मध्ये या योजनेला शासन मान्यता मिळाली आहे .या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक विकासाला गती मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना 1500 रु ची आर्थिक मदत दर महिन्याला केली जाते .या योजनेसाठी सरकारने काही नियम अटी व निकष घातले आहेत .लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रु ची आर्थिक मदत केली जाते .ही योजना राज्यातील आर्थिक मागास कुटुंबातील महिलांना लाभ मिळावा व कोणत्याही कुटुंबातील महिला योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे .

लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरळित  व सुनिश्चितपणे कार्यरत राहण्यासाठी व बोगस प्रमाणपत्रे सादर करून लाभ घेणाऱ्यांना आळा बसण्यासाठी सरकारने काही निकष घातलेले आहेत. त्यापैकी च एक निकष म्हणजे e-kyc अपडेट करणे.राज्यातील पात्र महिलांची सत्यता पडताळणी करिता E -kyc अपडेट करणे आवश्यक आहे.सरकारने e-kyc अपडेट करण्यासाठी शेवटची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत दिलेली होती . परंतु e-kyc अपडेट करताना काही कारणामुळे चुकीचा पर्याय निवडल्या गेला असे निदर्शनास आले त्यामुळे काही पात्र असूनही अपात्र ठरविल्या गेले .

महिला व  बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून E kyc बद्दल महत्त्वाची बातमी दिली आहे . मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी (physical verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .

e-kyc म्हणजे काय ?

e-kyc म्हणजे ( electronic know your customer) डिजिटल पद्धतीने ग्राहकाची ओळख पडताळणी करण्याची प्रक्रिया. E kyc करण्याचे फायदे म्हणजे जलद प्रक्रिया, कागदपत्राची गरज भासत नाही , फसवणूक कमी होते , सरकारी योजनांचे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात .e-kyc न केल्यास योजनेचा , लाभ मिळणे बंद होते .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाइट

वाचकहो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती कशी वाटली ते आम्हाला comment द्वारे सांगा ,काही शंका व सूचना  असल्यास नक्की विचारा . सरकारी योजनेबद्दल , सरकारी नोकरभरती बद्दल आम्ही नियमित पोस्ट टाकत राहतो , अश्याच माहिती करिता marathiarticle.site या आमच्या वेबसाइटला नियमित वेळोवेळी भेट देत राहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top