Maharashtra Teacher Recruitment 2026: महत्वाची मोठी अपडेट !!!

Maharashtra Teacher Recruitment 2026

Maharashtra Teacher Recruitment- 2026📚

महाराष्ट्र राज्यात शिक्षक भरती हा नेहमीच विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक क्षेत्रात  करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय राहिला आहे. दरवर्षी राज्य सरकारकडून विविध टप्प्यांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया राबविल्या जाते. प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक पदांसाठी ही भरती केली जाते .या लेखामध्ये आपण Maharashtra Teacher Recruitment -2026 बद्दल, सविस्तर , सोप्या शब्दात आणि अपडेट माहिती जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये अनेक दिवसांपासून संभ्रम होता.MAHA-TAIT परीक्षा झाली , निकाल लागला आता पुढे भरती केव्हा होणार ?  भरती संदर्भात नवीन अपडेट केव्हा येणार ? असे अनेक प्रश्न शिक्षक उमेदवारांना पडले होते .पण आता प्रतीक्षा संपली , नुकतीच महाराष्ट्र शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे!!

दिनांक. 1 जानेवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज संस्थेच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक  शाळांतील शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणार आहे . दरवर्षी खूप शिक्षक सेवानिवृत होत असतात ,व सेवानिवृत झालेल्या शिक्षकाच पद रिक्त होत असते त्यामुळे शाळेतील अध्यापनाच कार्य सुरळीत चालू राहण्याकरिता शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने शासनाने 1 जानेवारी 2026 रोजी निर्णय जाहीर केला आहे .

वरील बाबींच्या संदर्भात क्रं 1 शासन निर्णयानुसार सध्याच्या स्थितीत 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे .राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळेतील संचमान्यतेनुसार महिना मे 2026 अखेर रिक्त होण्याची शक्यता असलेल्या पदांचा विचार करण्यात आला आहे .त्यानुसार संदर्भ क्रमांक 1 मधील शासन निर्णयात ठरवून दिलेल्या मर्यादानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 (TAIT ) मध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदे भरण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. ज्यांनी आधी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी (TAIT) परीक्षा दिलेली आहे आणि सोबतच B.ED,D.ED झालेलं आहे त्यांनाच पवित्र पोर्टल वर नोंदणी करता येईल. त्यामुळे पात्र उमेदवारांनाच पवित्र पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी  2025 (TAIT )परीक्षा मधील गुणाच्या आधारे पदभरती करण्यास शासनाची मान्यता भेटली आहे.TAIT 2025 दिलेल्या पात्र शिक्षक उमेदवारांना पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी (TAIT) शेवटची दिनांक 6/1/2026 तर स्व प्रमाणपत्र ( self-certification) स्व प्रमाणित करण्यासाठी दिनांक 8/1/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवा .

पवित्र पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा .

पवित्र पोर्टल वर नोंदणी कशी करावी :-💻

Pavitra Portal Maharashtra ची वेबसाइट उघडल्यानंतर तिथे होमपेज नावाच पेज असेल त्यावर क्लिक केल्यानंतर New Registration/नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमची स्वतःची माहिती अचूक भरा.जसे की उमेदवाराचे पूर्ण नाव ,मोबाईल नंबर,email id, जन्मतारीख,आधार नंबर टाकून verification साठी एक One time password (OTP) येईल तो OTP section मध्ये येईल तो भरा. त्यानंतर login id आणि password तयार करा. त्याच login id आणि password ने login करा . त्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती भरावी लागेल, 10 वी,12 वी ,D.ed ,B.ed आणि TAIT चे गुणपत्रक,तसेच इतर माहिती रेकॉर्ड,भरा. कागदपत्रे upload करा जसे की पासपोर्ट फोटो,signature, शैक्षणिक कागदपत्रे,TAIT गुणपत्रक जात प्रमाणपत्रक. हे सर्व झाल्यानंतर तुमचा अर्ज तपासून घ्या आणि नंतर अर्ज verify करा. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्या अर्जाची print save करून ठेवा.

2026 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती होण्याची शक्यता आहे.अनेक शाळांमध्ये रिक्त पदे असून ते भरण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेत आहे . डिजिटल शिक्षण , नवीन अभ्यासक्रम आणि NEP 2020 च्या अंमलबजावणीमुळे शिक्षकाची गरज आणखी वाढली आहे. शिक्षक भरती बद्दल काहीही नवीन अपडेट आल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू ..

Maharashtra Teacher Recruitment ही शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत सुवर्णसंधी आहे .योग्य पात्रता , आणि चांगली तयारी केल्यास शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

वाचकहो तुम्हाला maharashtra teacher recruitment 2026 नोकरभरती बद्दल अपडेट कशी वाटली ते आम्हाला comment द्वारे सांगा ,काही शंका व सूचना  असल्यास नक्की विचारा . सरकारी योजनेबद्दल , सरकारी नोकरभरती बद्दल आम्ही नियमित पोस्ट टाकत राहतो , अश्याच माहिती करिता https ://marathiarticle.site/ या आमच्या वेबसाइटला नियमित वेळोवेळी भेट देत राहा.

Mpsc Bharti :- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2026

    Leave a Comment

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Scroll to Top