
अनुक्रमणिका
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प( PoCRA ) पार्श्वभूमी
महाराष्ट्रातील खूप मोठा लोकसंख्या वर्ग हा शेती वर आधारित आहे . महाराष्ट्रातील एकूण आर्थिक विकासामध्ये शेतीचा मौल्यवान वाटा आहे . अलीकडेच वर्ष दर वर्षांनी हवामानात बदल होत असल्याने शेती वर खूप मोठा परिणाम होत आहे .शेतकरी वर्ग रात्र अन् दिवस मेहनत करूनही पाहिजे तसे उत्पन्न होत नाही, वर्षानुवर्षे चाललेली मेहनत आणि शेतीवरील खर्चाने शेतकरी हवालदिल झाला आहे .
महाराष्ट्रातील शेती 82% हून अधिक जमीन कोरडवाहू असल्या कारणाने पिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या कमतरतेमुळे , पिकांवर खूप मोठा परिणाम होतो याच गोष्टीचा फटका लहान शेतकऱ्यांना सहन करावा लागतो . दिवसेंदिवस कमी होत असलेली जमीनधारणा , अतिवृष्टी , कोरडा दुष्काळ,या सर्व कठीण परिस्थितीत शेती करणे ही खूप मोठी जोखीम बनत चाली आहे . शेतकऱ्यांना लागणारे कृषी यांत्रिकीकरण,शेती पूरक व्यवसायाला लागणारा खर्च ,शेती ला लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्याची गरज आहे . त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी, शेतीपूरक व्यवसायाला आर्थिक सहाय्य मिळावे, शेती आधुनिक रित्या सक्षम व्हावी,शेती मध्ये नवीन प्रकल्प, प्रयोग करता यावे ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र राज्य शासनाने जागतिक बँकेच्या सहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे .
प्रकल्प क्षेत्राची व्याप्ती टप्पा पहिला :-
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प /project on climate resilient agriculture 2.0 ) जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे 2018 पासून राबविण्यात येत आहे .हा प्रकल्पाचा पहिला टप्पा 2018 ते 2024 यादरम्यान 16 जिल्ह्यातील 5220 गावात राबविल्या गेला तर दुसरा टप्पा 2025 ला सुरू होऊन या प्रकल्पाचा कालावधी 6 वर्षांकरिता आहे .
प्रकल्प क्षेत्राची व्याप्ती टप्पा दुसरा :-
राज्य सरकारने 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 21 जिल्ह्यातील 225 तालुके,आणि 7196 गावे समाविष्ट आहेत.मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड,लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव,हिंगोली, तर विदर्भातील ,नागपूर , भंडारा, गडचिरोली,वाशीम , वर्धा , बुलढाणा, अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ,गोंदिया ,आणि खानदेशातील जळगाव,नाशिक ह्या जिल्ह्यात ह्या योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे.
पोकरा योजने अंतर्गत मिळणारे लाभ
- शेततळी
- हरितगृह
- नवीन विहीर
- शेडनेटगृह
- पंप संच
- शेती शाळा
- शेळीपालन
- विहीर पुनर्वसन
- सामूहिक शेततळे
- ठिबक सिंचन
- फळबाग लागवड
- सेंद्रिय उत्पादन
- बिजोत्पादन
- वृक्ष लागवड
- रेशीम उद्योग
- कुकुटपालन
- कृषी यांत्रिकीकरण व इतर
प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्टे
- दुष्काळग्रस्त भागात शेतीला ठिबक सिंचन उपलब्ध करून देणे.
- शेतकऱ्याच्या उत्पन्नात भरघोस वाढ
- सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊन सेंद्रिय शेतीला मदत करणे.
- शेतीला लागणारे साधने कृषी यांत्रिकीकरण उपलब्ध करून देणे.
- शेतीविषयक सल्ला,व हवामान बदलानुसार मार्गदर्शन करणे.
- रब्बी व उन्हाळी क्षेत्रामध्ये हंगामातील पिकांच्या उत्पादनात वाढ.
- शेतीपूरक व्यवसायाला प्रोत्साहन देणे
- शेतीची आधुनिकीकरणांकडे वाटचाल करणे.
- शेतीचा खर्च बचत करण्यासाठी अनुदान वितरित करणे.
निवड झालेल्या गावाची यादी कशी पहावी ?
https://gis.mahapocra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या . मेन मेन्यू वर क्लिक करा तिथे phase 2 नावाचा option असेल त्यावर क्लिक करा . क्लिक केल्यानंतर तुम्हाला selected village नावाचा option दिसेल त्यावर क्लिक करा ,नंतर तुम्हाला selection menu मध्ये तुमचा जिल्हा ,व तालुका निवडायचा आहे . नंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यातील निवड झालेल्या गावाची यादी दिसेल .
योजनेचा अर्ज कुठे करायचा.
https://dbt.mahapocra.gov.in/या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करून आवश्यक ती कागदपत्रे सादर करा.
सूचना
- 5 हेक्टर पर्यंत ज्याच्या जवळ जमीन असेल ते शेतकरी वैयक्तिक लाभासाठी पात्र राहील.
- ज्या गावाची PoCRA योजनेमध्ये निवड झालेली आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील .
- योजनेचा कालावधी सुरू झाल्यापासून 6 वर्ष राहील 2030- 2031 पर्यंत.
- पात्र झालेल्या गावातील शेतकऱ्यांना आपला अग्रिस्टॅक मधील शेतकरी ID क्रमांक वापरून प्रकल्पाच्या https://dbt ndksp.mahapocra.gov.in/ संकेतस्थळाद्वारे किंवा कृषी विभागाच्या महाविस्तार ए आय अँप द्वारे अर्ज सादर करता येईल.
- परसातील कुक्कुटपालन व शेळीपालन साठी फक्त भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत महिला पात्र असतील.
- वैयक्तिक लाभासाठीच्या घटकांच्या मार्गदर्शक सूचना प्रकल्पाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा..
वाचकहो तुम्हाला PoCRA योजनेबद्दल माहिती कशी वाटली ते आम्हाला comment द्वारे सांगा ,काही शंका व सूचना असल्यास नक्की विचारा . सरकारी योजनेबद्दल , सरकारी नोकरभरती बद्दल आम्ही नियमित पोस्ट टाकत राहतो , अश्याच माहिती करिता marathiarticle.site या आमच्या वेबसाइटला नियमित वेळोवेळी भेट देत राहा.
