Table of contents
रात्री लवकर शांत झोप लागण्यासाठी प्रभावी उपाय.
चला आज आपण बघूया झोप न येण्याची कारणे व त्यावरील उपाय. झोप न लागणे (insomnia ) ही आपल्या आरोग्यासाठी खूप गंभीर बाब आहे खूप साऱ्या आजाराच प्रमुख कारण आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे आपण विसरत चाललो आहोत . दिवसभराचा ताण, त्रास हे तर दररोजच झाल आता त्यामुळे insomnia चा त्रास खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे .आपल्या आरोग्यासाठी , व्यायाम,स्वच्छ राहण ,योग्य आहार घेणं महत्वाचं आहे तितकेच 7 ते 8 तास झोप घेणं हे ही तितकंच महत्वाचं आहे .झोप ही आरोग्यासाठी खूप महत्वाची मानली जाते .

दिवसभर व्यवस्थित काम करण्यासाठी रात्रीची झोप खूप आवश्यक आहे.रात्री झोप लागत नाही यामागे खूप काही कारणे असू शकतात जसे की रात्रभर मोबाईल वर रिल बघणे ,कोणाला रात्री अतिविचार करण्याची मानसिक सवय असते तर कोणाला दिवसभराचा कामाचा ताण, काहीना वेगवेगळे आजार यामुळे ही झोपेची समस्या उद्भवते .कमी झोपेमुळे भविष्यात खूप मोठ्या आजाराना सामोरे जावे लागते ,जसे की Alzehimer disease ,dementia ,migraine ,Parkinson disease, cognitive decline,erectile dysfunction अजून बरेच काही आजार होण्याची जास्त शक्यता असते उपाययोजना:-
Insomnia हा slow poison सारखं काम करत असत सुरवातीला काहीही वाटत नाही पण हळूहळू त्याचा परिणाम जाणवायला लागतो.त्यामुळे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत अशा सवयी,आणि उपाययोजना त्यामुळे तुम्हाला झोप लागण्यासाठी मदत होईल .
झोप घेण्याचे फायदे व उपाययोजना

रात्री झोपण्याचा 1 तास आधी मोबाईल वापरणे बंद करा .मोबाईल मधल्या blue light मुळे melatonin नावाचा sleep hormone disturb hoto त्याच्या निर्मितीला अडथळा तयार होतो . मोबाईल स्क्रीन च्या blue light मुळे आपला मेंदू हा अलर्ट mode मध्ये जास्त असतो .मेंदूला calm mode मिळत नाही.मन relax होत नाही त्यामुळे मोबाईल ला रात्री वापरायचा झाल्यास 9 वाजेपर्यंत वापर करावा आणि मोबाईल मधे blue light filter/ reading mode वर ठेवावा जेणेकरून स्क्रीन मधून येणारी blue light कमी प्रमाणात पडेल.
झोपण्याआधी relax feel करा,आजच काम झालंय अस स्वतःच्या मनाला सांगा .झोप आपल्यासाठी आवश्यक आहे आणि आज झोप घेतली तर उद्या काम करायला थकवा येणार नाही . वाटलंस तर झोपेआधी तुम्ही गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ करू शकता .परत तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेर पडता त्यावेळेला तुमच्या शरीराचं तापमान हे कमी होत जात आणि हेच झोपेच green signal देत. यामुळे झोप लागण्यास खूप मदत होईल .

सकाळी 10, ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात उभे रहावे जेणेकरून सूर्यप्रकाशात उभे राहल्याने मेंदू मधील serotonin नावाचा neurotransmitter रासायनिक घटक वाढायला मदत होते ज्यामुळे मेंदू व शरीर relax feel करत. रात्री झोप लागण्यास खूप जास्त मदत होईल .melatonin नावाचा हार्मोन तयार होण्यास serotonin नावाचा घटक महत्वाचा मानला जातो.
झोप लागण्यासाठी असे ही काही योगासने आहेत की ज्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती सोबत झोप लागण्यास ही मदत होईल .

अमेरिकन military sleep techniques खूप प्रसिद्ध आहे. ही पद्धत सैनिकांना कठीण परिस्थित पण 2 मिनिट मध्ये झोपायला मदत करते .
चेहरा पूर्ण relax करा , हात पाय पूर्ण relax करा . स्वतःला कल्पना करा की मी आरामात आहे , निसर्गरम्य वातावरणात बसलेलो आहे ,मी शांत आहे.यामुळे अधिक विचार येणे बंद होतात .हळूहळू श्वास आत घ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा .आता 4 सेकंद श्वास आत घ्या आणि 4 सेकंद hold करा सोडताना 6 सेकंद मध्ये श्वास सोडा.असे 2 मिनिट सुरू ठेवा झोप लागण्यास मदत होईल.
झोप लागण्यासाठी महत्त्वाचे योग .

Balasana,viprita karani,shavasana ,Suryanamaskar,tadasana.
ह्या योगाचे व्हिडिओ तुम्ही YouTube वर सर्च करून बघू शकता .

तसेच डॉक्टरांना भेटून रक्त तपासणी करून घ्या जर थायरॉईड , vitamin B12 deficiency , vitamin D deficiency , magnesium deficiency असेल तरीही झोपेची समस्या उद्भवू शकते .
रात्री लवकर झोप येत नाहीये या विषयावरती तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते नक्की comment करून सांगा. काही शंका व काही प्रश्न असतील पोस्टबद्दल तर नक्की विचारा . अश्याच आरोग्याबद्दल, नोकरभरती बद्दल व इतर माहितीसाठी https://marathiarticle.site या वेबसाइट ला वेळोवेळी भेट देत राहा. आम्ही अश्याच माहितीविषयी नियमित पोस्ट टाकत असतो.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना kyc अपडेट : सरकारची महत्त्वाची मोठी घोषणा !!
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 ( PoCRA) योजनेचा दुसरा टप्पा यादी जाहीर!!
- Maharashtra Teacher Recruitment 2026: महत्वाची मोठी अपडेट !!!
- Top 10 best motivational Bollywood movies in Hindi !!!
- Mpsc Bharti :- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 87 पदाकरीता मोठी भरती -2026
