आजकालचे धावपळीचे जीवन, चुकीचा आहार, तणाव आणि अनियमित दिनचर्या यामुळे Vitamin B12 ची कमतरता खूप वाढली आहे. भारतात विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. कारण Vitamin B12 मुख्यत्वे प्राणिजन्य अन्नामध्ये आढळतो. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता झाली तर थकवा, कमजोरी, चक्कर, स्मरणशक्ती कमी होणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. योग्य वेळी उपचार न केल्यास ही कमतरता गंभीर स्वरूप धारण करू शकते.
या पोस्टमध्ये आपण Vitamin B12 कमी होण्याची सर्व लक्षणे, कारणे, तपासणी, आणि उपाय अत्यंत सोप्या भाषेत पाहणार आहोत.
Vitamin B 12 म्हणजे काय ?
Vitamin B12 (Cobalamin) हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहे जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही. हे व्हिटॅमिन खालील महत्त्वाच्या कामांसाठी आवश्यक आहे:
- लाल रक्तपेशी (RBC) तयार करणे
- मेंदू व नर्व्ह सिस्टीमची कार्यक्षमता
- ऊर्जा तयार करणे
- DNA बनवणे
- स्मरणशक्ती व एकाग्रता टिकवणे
Vitamin B12 कमी असल्याची लक्षणे
Vitamin B12 ची कमतरता हळूहळू वाढत जाते. त्यामुळे सुरुवातीला लक्षणे अगदी साधी वाटतात. पण नंतर ती गंभीर होऊ शकतात.
- अत्याधिक थकवा (Fatigue)
शरीरातील ऊर्जा उत्पादन कमी झाल्यामुळे सतत थकल्यासारखे वाटते. अगदी साधे काम केले तरी दम लागतो.
कमजोरी व हातपाय सुन्न होणे
Vitamin B12 नसल्यास नर्व्हस सिस्टीम प्रभावित होते. हात-पाय सुन्न होणे, झिणझिण्या येणे हे पहिले स्पष्ट संकेत आहेत.
चक्कर येणे
हिमोग्लोबिन आणि RBC कमी झाल्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो आणि वारंवार चक्कर येते.
स्मरणशक्ती कमी होणे
मेंदूतील नर्व्ह सिग्नल्स योग्यरित्या पोहोचत नाहीत. त्यामुळे
- एकाग्रता कमी होणे
- विसरभोळेपणा वाढणे
- मेंदू “ब्लॅंकी” वाटणे ही लक्षणे दिसू शकतात .
त्वचेचा रंग पिवळसर होणे
Vitamin B12 कमी झाल्यास ‘मेगालोब्लास्टिक ऍनिमिया’ होतो. त्यामुळे चेहरा थोडा पिवळसर किंवा फिकट दिसू शकतो.
श्वास लागणे / हृदयाचे ठोके वाढणे
रक्तातील ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे हृदय अधिक वेगाने काम करते. त्यामुळे थोड्या हालचालीतही श्वास लागतो.
Depression, Anxiety, Mood Swings
Vitamin B12 हे ‘Feel Good’ chemicals तयार करण्यात मदत करते. त्याची कमतरता झाल्यास:
तणाव वाढणे, मन खिन्न होणे, कामात रस नसणे ,ही symptoms दिसतात.
Vitamin B12 संपन्न असणारा आहार
Vitamin B12 संपन्न असणारा मुख्य स्त्रोत.
दूध, अंडी ,चिकन ,मासे , मांस,यामध्ये खूप vitamin B12 असतात जे आपल्याला शाकाहारी जेवणातून मिळत नाही.
Vitamin B12 कमी होण्याची प्रमुख कारणे
पचनाचे आजार
IBS
Gastritis
Acidic समस्या
पोटातील intrinsic factor कमी
यामुळे शरीर B12 शोषू शकत नाही.
दीर्घकाळ औषधे घेणे
Metformin (diabetes औषध), acidity औषधे, antacids यामुळे B12 कमी होते.
धूम्रपान / चुकीची जीवनशैली
तंबाखू, सिगारेट, अल्कोहोलने B12 कमी होण्याचा वेग वाढतो.
Vitamin B12 ची तपासणी कशी करतात?
रुटीन Vitamin B12 Blood Test पुरेशी असते.
साथी काही डॉक्टर खालील टेस्टही सुचवतात:
CBC
Vitamin D
Homocysteine level
Folate level
B12 ची आदर्श रेंज साधारण: 300–900 pg/mL
300 च्या खाली असेल तर कमतरता निश्चित समजली जाते.
B12 कमतरता किती वेळात भरते?
योग्य diet + supplements घेतल्यास:
4–6 आठवड्यात ऊर्जा वाढते
3 महिन्यात लेव्हल सुधारते
नर्व्ह damage भरायला 6–9 महिने लागू शकतात
निष्कर्ष:
Vitamin B12 ची कमतरता दिसायला साधी वाटते पण तिची परिणामकारकता शरीरावर खूप गंभीर असू शकते. थकवा, सुन्नपणा, चक्कर, एकाग्रता कमी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी करून उपचार घेतल्यास ही कमतरता पूर्णपणे भरून निघू शकते.
योग्य आहार, supplements आणि निरोगी जीवनशैली हा Vitamin B12 कमतरतेवर सर्वात प्रभावी उपाय आहे .

